संसर्ग शिरला घरात पुण्यामध्ये बारा दिवस घरात बंदिस्त गृहिणी आढळली काेराेना पॉझिटिव्ह

देशभरात २२ मार्चला ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात अाला, तर २४ मार्चला ‘लाॅकडाऊन’ची घाेषणा करण्यात अाली. तेव्हापासून १२ दिवस घरात बंदिस्त असलेल्या पती-पत्नीपैकी गृहिणी पत्नीला काेराेनाची बाधा झाला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस अाली अाहे. अचानक दवाखान्यात दाखल हाेऊन काेराेनाची चाचणी पाॅझिटिव्ह अालेल्या पत्नीला पतीची भेट हाेणे अशक्य बनले असून घाबरलेल्या ३६ वर्षीय पत्नीला फाेनवरूनच पती राेज धीर देऊन काेराेनाविराेधात लढण्याची ताकद देत अाहे.


पुणे शहराजवळील पिरंगुट या ग्रामीण भागातील गावात संबंधित दांपत्य राहत असून मराठवाड्यातून कामाच्या निमित्ताने पती १५ वर्षांपूवी या ठिकाणी भाड्याच्या खाेलीत राहण्यास अालेला अाहे. कारचालक म्हणून ताे अनेक वर्षांपासून काम करत असून कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताे. १२ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून अद्याप मूलबाळ झाले नसल्याने पती अाणि पत्नी असे दाेघेच पिरंगुट येथे राहतात. उर्वरित सर्व त्यांचे नातेवार्इक गावी असल्याने घरी फारसे काेणाचे येणे-जाणे नाही. चार-पाच दिवसांपूर्वी घरातच असलेल्या पत्नीला ताप अाणि खाेकला येऊ लागल्याने पिरंगुट येथील एका डाॅक्टरकडे उपचारासाठी दाखल करण्यात अाले, परंतु एक दिवस दवाखान्यात अॅडमिट करून तब्येत ठीक हाेत नसल्याने काेराेनाच्या पार्श्वभूमीवर डाॅक्टरांनी त्यांना पुण्यातील नायडू सांसर्गिक रुग्णालयात जाऊन तपासणी करा, असे सांगितले. त्यामुळे पतीने त्याच्या एका मित्राला कार घेऊन बाेलावले अाणि पती-पत्नी नायडू रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांना डाॅक्टरांनी पत्नीसाेबत तिचे पती व मित्रालाही दाखल करून घेत तिघांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवले. प्रयाेगशाळेचा अहवाल अाल्यानंतर पत्नी काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले, तर पती व त्याचा मित्र हे निगेटिव्ह असल्याची बाब समाेर अाली. त्यामुळे पती अाणि त्याच्या मित्राला राहत्या घरी १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देत पत्नीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात अाले अाहे.


माझ्याएेवजी पत्नीला कसा काेराेना झाला समजेना


संबंधित काेराेना पाॅझिटिव्ह महिलेच्या पतीने सांगितले की, पत्नीला श्वसनाचा अथवा दम्याचा काेणता त्रास नाही. गृहिणी असल्याने ती कामासाठी बाहेर कुठे जास्त जात नाही किंवा अाम्ही दाेघेही बाहेर फिरण्यास जाण्याचे प्रमाण कमी अाहे. चालक असल्याने मी अनेक ठिकाणी फिरत असल्याने काेराेनाची लागण मला झाली असती तर समजू शकलाे असताे, परंतु पत्नीला कशी लागण झाली याचा अद्याप उलगडा झाला नाही. शासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने लाॅकडाऊनपासून अाम्ही दाेघे घरातच असून घराबाहेर पडलेलाे नाही, त्यामुळे तिच्यासाेबत राहूनही मला काेराेना कसा झाला नाही हेही उमजत नाही. या प्रकारामुळे पत्नी घाबरलेली असून तिचे रुग्णालयातून माझ्याशीही बाेलणे कमी झाले अाहे. तिच्याजवळ साधा माेबाइल असल्याने व्हिडिअाे काॅलही करू शकत नाही. मात्र, ‘तुला काही हाेणार नाही, लवकरच तू बरी हाेशील, तुझा अात्मविश्वास कायम ठेव’, असे सांगत तिला अाधार देण्याचे काम करत अाहे.


पुण्यात २४ तासांत कोरोना संसर्गाचे तीन बळी


कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात चोवीस तासांत कोरोनाच्या तीन बळींची भर पडली. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पडलेल्यांची पुण्यातील संख्या आता पाच झाली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या तीन मृत्यूंमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांची वये अनुक्रमे ६० आणि ६९ अशी होती. तसेच ५२ वर्षांच्या एका पुरुषाचाही आज मृत्यू झाला. यापैकी ६० वर्षांची महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, तिचा अहवाल निगेटिव्ह आला म्हणून तिला घरी सोडण्यात आले होते. मृत्यूनंतर त्यांचा देह ससूनमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला. तेथील तपासणीत तिला कोरोना झाल्याचा अहवाल मिळाला. ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससूनमध्येच झाला असून, त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती मिळाली. रविवारी सकाळी औंध रुग्णालयात ६९ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांना पित्ताशयाचा विकार होता. तपासणीसाठी नायडूमध्ये पाठवल्यावर तेथे जागेची कमतरता असल्याने त्यांना औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुण्यात झालेल्या पाचही मृत्यूंमध्ये विदेश प्रवासाचा कुणाचाही इतिहास नाही. स्थानिक संसर्गामुळे हे रुग्ण कोरोनाग्रस्त झाल्याचे सिद्ध झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.