होम क्वारेंटाइन लोकांना बाहेर फिरू नका, असे सांगायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, तीन अधिकारी व सहा कर्मचारी जखमी

बारामती- होम क्वारेंटाइन केलेल्या नागरिकांना घराबाहेर फिरू नका, असे सांगायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात घडली आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत 2 पोलिस अधिकारी, महिला पोलिस अधिकाऱ्यांसह 5 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने लॉकडाउन घोषित केले आहे. तरीदेखील अनेकजण बाहेर फिरत असल्याचे दिसत आहे. यातच बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना हकलण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. पण, यात अनेक ठिकाणी पोलिस आणि नागरिकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. बारामतीमधील जळोची येथे घडली आहे. होम क्वारेंटाइन नागरिकांना घरात जाण्यास सांगितल्यामुळे जमावाने पोलिसांच्या पथकावरच हल्ला केल्याची घटना घडली आहे.


घटनेनंतर परिसरात काही काळ तनाव होता. यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे.


सांगलीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण सापडले, सगळेच एकाच कुटुंबाचे सदस्य


मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 147 झाला आहे. विदर्भात कोरोना व्हायरसचे 5 नवीन रुग्ण सापडल्याची माहिती शुक्रवारी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. यानंतर सांगलीतील इस्लामपूर येथे कोरोनाचे 12 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रासाठी ही बाब अतिशय चिंताजनक आहे. तत्पूर्वी गुरुवारी रात्रीपर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 130 झाली होती. एकाच दिवसात गुरुवारी 8 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाउनचा आजचा चौथा दिवस असून ठिक-ठिकाणी लोक अंतर ठेवूनच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसून आले.