पुणे. दिवसेंदिवस काेराेनाचा प्रार्दुभाव सर्वत्र वाढत असून पुणे आणि मुंबई शहरात सदर विषाणूचा संर्सग माेठया प्रमाणात पसारल्याचे दिसून येऊ लागले आहे. पुणे शहरात दाेन दिवसातच 14 जणांचा बळी गेला असून काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नायडू रुग्णालयातील 100 काेराेना रुग्णांची क्षमता पूर्ण झाल्याने नवीन रुग्णांना ससून अथवा अाैंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत अाहे.
मंगळवारी पुण्यात अाठ काेराेना रुग्णांचा मृत्यु झाला असून बुधवारी सहा जणांचा मृत्यु झाला अाहे. ससून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी10 जणांचा मृत्यु झाला अाहे. याशिवाय नायडू रुग्णालय, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, नाेबेल रुग्णालय, अाैंध जिल्हा रुग्णालय येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यु झाला अाहे. काेराेनाचा तिसरा टप्प्यातील रुग्णांची संख्या यामध्ये प्रामुख्याने असून स्थानिकांकडून स्थानिकांना राेगाचा फैलाव हाेत असल्याचे दिसून येत असल्याने प्रशासना समाेरील चिंता वाढली अाहे. दरम्यान, पुण्यातील 21 किलाेमीटरचा पूर्व बाजूचा भाग पुणे मनपाचे वतीने सील करण्यात अाला असून नागरिकांचे ये-जा वर नियंत्रण अाणण्यात अाले अाहे.